पारोळा येथे अटलजींनी सर्वपक्षीय श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:06 IST2018-08-22T23:59:51+5:302018-08-23T00:06:54+5:30
नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी केला अटलजींच्या कार्याचा गौरव

पारोळा येथे अटलजींनी सर्वपक्षीय श्रद्धांजली
पारोळा, जि.जळगाव : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना बुधवारी सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
बोहरा सेंट्रल स्कूलच्या प्रांगणात ही शोकसभा घेण्यात आली.
या वेळी खासदार ए.टी. पाटील यांनी, राजकीय लोकांच्या हृदयात आपुलकीचे स्थान मिळविणारे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व अटलबिहारी यांचे होते, संसदेची गणिमा टिकून ठेवणारे हजरजबाबी नेते होते, असे सांगितले.
आमदार डॉ.सतीश पाटील म्हणाले, अटलजी हे राजधर्म पाळणारे, देशाला विकासाची दिशा देणारे सर्वमान्य नेते होते. त्यांच्या अंगी मोठेपणा होता. त्यांच्यासारखा नेते होणे आता शक्य नाही.
माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे म्हणाले, लोकशाहीवर निष्ठा ठेवणारे सामान्य जनतेला न्याय देणारे सर्वांना हवेहवेसे वाटणार असे सर्वमान्य नेतृत्व अटलजी यांचे होते. अटलजी दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते, असे माजी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले. अजात शत्रू असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलजी होते, असे नगराध्यक्ष करण पवार म्हणाले.
माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष पिरन अनुष्ठान, दत्तात्रय महाजन, डॉ.शांताराम पाटील, बापू नावरकर, डॉ.जे.के.पाटील, मिलिंंद मिसर, व्ही.एन.कोळी, अनिल पाठक, वामन चौधरी आदींनी भावना व्यक्त केल्या.
जि.प.चे माजी सदस्य बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण दाणेज, नगरसेवक रोहन मोरे, नगरसेविका रेखा चौधरी, सुनंदा वाणी, वर्षा पाटील, सुरेखा बडगुजर, मुकुंदा चौधरी, प्रकाश महाजन, पी.जी.पाटील, बाळासाहेब पाटील, केशव क्षत्रिय, श्रीकांत शिंपी, अतुल मोरे, मधुकर पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.शैलेश पाटील यांनी केले.