शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर फेकले सिलिंडर, महिलेने घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 10:44 IST

Crime News : दीड वाजता पथक त्याच्या घरी जिन्यावरुन चढत असताना कुत्रा भुंकायला लागला, त्यामुळे पोलीस आल्याचे चाहूल लागताच डबल याने गच्चीवर जाऊन तेथून शेजारी राहणाऱ्या अफरस बेग नूर बेग उर्फ कालू याच्या घरात घुसला. पोलीस तेथे पोहचताच दुसऱ्या घरात शिरला.

जळगाव : प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगाराने अटक करायला गेलेल्या पोलिसांच्या अंगावर रेग्युलेटर काढून भरलेले गॅस सिलिंडर फेकले तर त्याच्या आईने झटापटीत चावा घेतल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास गेंदालाल मील भागात घडली. यात शहर पोलीस ठाण्याचे अमलदार प्रफुल्ल धांडे जखमी झाले असून जुबेर उर्फ डबल भिकन शेख (वय २५) याच्यासह त्याची आई मुमताजबी व भाऊ फारुख (सर्व रा. गेंदालाल मील) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्यात जुबेर उर्फ डबल भिकन शेख हा फरार होता. त्याशिवाय आणखी एक दुसरा गुन्हा दाखल असल्याने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी बुधवारी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पथकाला डबलसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा त्यांच्या घरी शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, तेजस मराठे, योगेश इंधाटे, प्रणेश ठाकूर, रतन गिते, कमलेश पाटील आदी जण गेंदालाल मील भागात गेले असता डबल घरी असल्याची माहिती मिळाली. दीड वाजता पथक त्याच्या घरी जिन्यावरुन चढत असताना कुत्रा भुंकायला लागला, त्यामुळे पोलीस आल्याचे चाहूल लागताच डबल याने गच्चीवर जाऊन तेथून शेजारी राहणाऱ्या अफरस बेग नूर बेग उर्फ कालू याच्या घरात घुसला. पोलीस तेथे पोहचताच दुसऱ्या घरात शिरला.

...तर स्वत:ला मारुन टाकेनपोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता डबल याने लोखंडी सळई घेत स्वत:च्या डोक्यावर व हातावर मारुन दुखापत करुन घेत ‘ तुम्ही माझ्याजवळ आले तर मी स्वत:ला मारुन टाकेन ’ अशी धमकी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलीस तेथून माघारी फिरुन खाली आडोशाला थांबले. थोड्या वेळाने पोलिसांना पाहून त्याने घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले, रेग्युलेटर काढून ते वरुनच पोलिसांच्या अंगावर फेकले. दैव बलत्तर म्हणून सिलिंडर फुटले नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव