चोपडा येथे लाच घेतांना सहायक फौजदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 13:27 IST2017-05-12T13:27:13+5:302017-05-12T13:27:13+5:30

सहायक फौजदार भास्कर राजधर ठाकूर (57) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले.

Assistant army officer detained while taking bribe at Chopda | चोपडा येथे लाच घेतांना सहायक फौजदार अटकेत

चोपडा येथे लाच घेतांना सहायक फौजदार अटकेत

 चोपडा,दि.12- गुरे वाहतूक करणारी चार चाकी वाहन सोडविण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजार रूपयांची लाच घेतांना चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार भास्कर राजधर ठाकूर (57) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले.

गुरे वाहतूक करणारे चारचाकी वाहन एका गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केले होते. ते सोडविण्यासाठी सहायक फौजदार ठाकूर यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रूपयांची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज सकाळी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनजवळ सापळा रचला होता. तक्रारदाराकडून दोन हजार  रूपयांची लाच घेतांना चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार भास्कर ठाकूर यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पराग सोनवणे  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ठाकूर यांना चौकशीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले आहे.

Web Title: Assistant army officer detained while taking bribe at Chopda