प्राणघातक हल्ला, चौघांना अटक
By Admin | Updated: March 20, 2017 00:42 IST2017-03-20T00:42:14+5:302017-03-20T00:42:14+5:30
पारोळा : एका जखमीची प्रकृती चिंताजनक

प्राणघातक हल्ला, चौघांना अटक
पारोळा : पूर्ववैमनस्यातून झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
18 रोजी रात्री 10.30 वाजता अमितकुमार लक्ष्मीकांत भावसार हे प}ी सीमा व मुलांसह अमळनेर-पारोळा रस्त्यावरील राणी लक्ष्मीबाईनगरात फिरायला गेले होते. तेथे आकाश नंदू लोहार याने त्यांना पाहून शिवीगाळ केली. अमितकुमारने हा प्रकार भाऊ नयनला सांगितला. तो थोडय़ाच वेळात घटनास्थळावर दाखल झाला. तेवढय़ात नंदू श्यामलाल लोहार, गुलाबदास श्यामलाल लोहार, आकाश नंदू लोहार, सागर गुलाबदास लोहार (सर्व रा. खांडेकरवाडा, पारोळा) हे कोयत्यासह दाखल झाले. त्यांनी नयनकुमार भावसार (रा.रथ गल्ली) यांच्या डाव्या कानालगत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले, तर अमितकुमार यास हातावर व पायावर मारहाण केली. लक्ष्मीकांत भावसार हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्यांनाही चापटा- बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी प्रवीण पाटील, डॉ. सुनील पारोचे यांनी प्रथमोपचार करून, त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. नयनकुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याप्रकरणी लक्ष्मीकांत भावसार यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौघांना अटक करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील करीत आहेत. (वार्ताहर)