अस्मी संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:44 IST2021-02-20T04:44:05+5:302021-02-20T04:44:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव :लेवा पाटीदार सोशल ॲण्ड स्पोर्टस फाऊंडेशनने आयोजित केलेल्या सरदार वल्लभभाई पटेल चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ...

Asmi Sangh winner | अस्मी संघ विजेता

अस्मी संघ विजेता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव :लेवा पाटीदार सोशल ॲण्ड स्पोर्टस फाऊंडेशनने आयोजित केलेल्या सरदार वल्लभभाई पटेल चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यात अस्मी एसर्स संघांने जेतेपद पटकावले. अस्मी संघाने अंतिम सामन्यात भादली फायटर्सवर विजय मिळवला. या दोन्ही संघातील अंतिम सामना हा चुरशीचा झाला होता. त्यात अखेरच्या क्षणी आपला खेळ उंचावत अमित काळे यांच्या अस्मीने जेतेपदाला गवसणी घातली. तिसरे स्थान खिरोदा संघाने पटकावले.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच पार पडले. पारितोषिक वितरण प्रसंगी स्पर्धेचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके, आमदार सुरेश भोेळे, आमदार शिरीष चौधरी, व्यावसायीक भागवत भंगाळे, उपमहापौर सुनिल खडके, विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन, माजी महापौर विष्णु भंगाळे, पांडुरंग काळे उपस्थित होते.

या स्पर्धेचे सोशल मिडियाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. तसेच त्याचा स्कोअर देखील सोशल मिडियावर दाखवला जात होता. हे सामने रात्री उशिरापर्यंत घेण्यात आले. या स्पर्धेसाठी लेवा पाटीदार फाऊंडेशनचे भुषण बढे, गौरव राणे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Asmi Sangh winner