आसिफच्या कुटुंबाची ‘एटीएस’कडून चौकशी

By Admin | Updated: October 2, 2015 01:01 IST2015-10-02T01:01:49+5:302015-10-02T01:01:49+5:30

जळगाव : मुंबईमधील 7/11 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आसिफ खान बशीर खान उर्फ अब्दुल्ला जुनेद याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तांबापुरातील त्याच्या घरी एटीएसकडून चौकशी करण्यात आली.

Asif's family's ATS inquiry | आसिफच्या कुटुंबाची ‘एटीएस’कडून चौकशी

आसिफच्या कुटुंबाची ‘एटीएस’कडून चौकशी

जळगाव : मुंबईमधील 7/11 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आसिफ खान बशीर खान उर्फ अब्दुल्ला जुनेद याला फाशीची शिक्षा झाल्याचे जाहीर झाली आहे, या घटनेनंतर तांबापुराभागातील रामनगरातील त्याच्या घरावर एसआयडी, एटीएसच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. तर दुपारी 12 वाजून 42 मिनिटांनी आसिफचा साडू व एक नातेवाईक अशा दोघांनी त्याच्या प}ीची भेट घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या भेटीत काय बोलणे झाले याचा तपशील समजू शकला नसला तरी मोक्का न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल असे या दोघांकडून त्याच्या प}ीला सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकमतप्रतिनिधीने भेट घेतली. लोकमतशी बोलताना केला.

आसिफ, अय्युब व अब्दुल्ला

आसिफ खान याची पोलीस रेकॉर्डला अय्युब शेख बशीर व अब्दुल्ला जुनेद अशा तीन नावांनी ओळख आहे. तसेच मुंबई, जळगाव व दिल्ली असे तीन ठिकाणचे रहिवासाचे पत्ते आहेत. या तीन नावे व पत्त्यामुळे पोलीस यंत्रणेचाही ब:याचदा गोंधळ उडाला आहे. जिल्ह्यात त्याच्यावर एमआयडीसी व भुसावळ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये तो निदरेष सुटला आहे.

मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आसिफ खान याच्या परिवाराची गुरुवारी

या भेटीत त्यांनी आसिफ कसा निदरेष आहे, व त्याला कसे गोवण्यात आले याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी माहिती दिली.

आसिफची आई हुस्नबानो खान यांनी सांगितले की, या साखळी बॉम्बस्फोटाची मुंबई गुन्हे शाखेने 2009 मध्ये चौकशी केली असता त्यात मोहम्मद सादीक (उत्तर प्रदेश) याचे मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आले होते. त्यानेही चौकशीत हा बॉम्बस्फोट मी व माङया साथीदारांनीच घडविल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

नंतर हा तपास एटीएसकडे गेल्यावर त्यांनी न्यायालयात गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीचा जबाब सादर केलाच नाही, असा आरोप आसिफची आई हुस्नबानो खान यांनी

रामनगरात साध्या व लहानशा घरात त्याच्या परिवाराचे वास्तव्य आहे. मुलगा पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली.

जळगावात सिमी संघटनेचा अध्यक्ष

आसिफ हा सध्या मुंबई येथील ऑर्थर रोड कारागृहाच्या अंडा सेलमध्ये आहे. मुंबई पोलिसांनी त्याची नार्को टेस्ट केली असता त्यात त्याने आपण जळगावात सिमी संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून सिमीच्या कामकाजाची कबुली दिली होती. जळगावमध्ये सिमीच्या या खटल्यात आसिफ खान व परवेज खान हे दोन आरोपी आहेत. सध्या या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरूआहे.

Web Title: Asif's family's ATS inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.