आश्रमशाळा शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By Admin | Updated: January 28, 2017 00:52 IST2017-01-28T00:52:13+5:302017-01-28T00:52:13+5:30
आश्रमशाळेतील मनोहर पाटील यांना नोकरीवरून कमी केल्याच्या कारणावरून समाजकल्याण कार्यालयात त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना प्रजासत्ताकदिनी घडली़

आश्रमशाळा शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील आश्रमशाळेतील कर्मचारी मनोहर राजधर पाटील (वय 40) यांना नोकरीवरून कमी केल्याच्या कारणावरून शहरातील समाजकल्याण कार्यालयाच्या प्रांगणात त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना प्रजासत्ताकदिनी सकाळी 7़30 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी कर्मचा:याविरोधात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
पाटील हे आश्रम शाळेत कार्यरत होते. नोकरीवर हजर करुन घेत नसल्याने गुरूवारी मनोहर पाटील यांनी महाबळ परिसरातील समाजकल्याण कार्यालय गाठले व आत्मदहनाचा प्रयत्न केला़ पाटील यांना कर्मचा:यांनी गेटमधून प्रवेश न दिल्याने त्यांनी कार्यालयाच्या भिंतीच्या कुंपनावरून उडी प्रांगणात अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला़ रामानंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.