अशोक सादरेंची आत्महत्या
By Admin | Updated: October 17, 2015 01:12 IST2015-10-17T01:12:19+5:302015-10-17T01:12:19+5:30
नाशिक : जळगाव जिल्ह्यातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले व निलंबित करण्यात आलेले अशोक सादरे यांनी पंचवटीत आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली़

अशोक सादरेंची आत्महत्या
नाशिक : जळगाव जिल्ह्यातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले व काही महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आलेले अशोक गोरख सादरे (50) यांनी पंचवटीत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ 16) सायंकाळच्या सुमारास घडली़ जुन्या आडगाव नाक्याजवळील वालझाडे मंगल कार्यालयामागे असलेल्या ओमनगरमध्ये ते राहत होत़े दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी पोलीस अधीक्षक सुपेकर व पोलीस निरीक्षक रायते यांच्या छळास कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटले आह़े अशोक गोरख सादरे यांचे कुटुंबीय शुक्रवारी बाहेर गेल्याने ते एकटेच घरी होत़े सायंकाळी कुटुंबीय परतल्यानंतर त्यांनी दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सादरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दृष्टीस पडल़े यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ ओमनगरमधीलच एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल़े त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आह़े दरम्यान, उशिरार्पयत पंचवटी पोलिसात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होत़े