शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

आशाबाबा नगरातील विवाहितेची आत्महत्या नव्हे, जाळून मारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:22 IST

कुटुंबाचा आरोप : आरोपी पती पोलीस असल्याने अभय

जळगाव : आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाऱ्या सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा मृत्यू जाळून घेतल्याने आत्महत्या भासविली जात असून प्रत्यक्षात तिला जाळून मारण्यात आले असल्याचा आरोप सोनालीचा भाऊ तथा लष्करातील जवान गोविंदा नामदेव चांभार यांनी केला आहे. या गुन्ह्यात सोनालीचा पती नरेंद्र भगवान सोनवणे पोलीस असल्याने त्याचा बचाव केला जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत न्याय मिळावा म्हणून गोविंदा यांनी पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.१० जुलै रोजी पहाटे २.३० वाजता सोनाली जळालीचा निरोप नातेवाईकांकडून मिळाला व सकाळी ७ वाजता तिचा मृत्यू झाल्याचा निरोप आला. बाथरुममध्ये जाळून घेतल्याने नातेवाईकांचे म्हणणे आहे, मात्र सोनालीचा पती पोलीस असल्याने त्याने सर्व पुरावे नष्ट केले असून तिला पती व सासरच्यांकडून प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास होता. प्रसुतीचा खर्च देखील माहेरच्यांकडून वसूल केला होता. सतत पैशांची मागणी केली जात होती, अशी तक्रार आहे. या घटनेनंतर ११ जुलै रोजी लष्करातील जवान असलेल्या भावाने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून बहिणीला जाळून मारण्यात आल्याबाबत सासरच्यांविरुध्द तक्रार दिली.विवाहितेच्या भावाने तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ती घेण्यात आली नाही. दोन दिवसांनी पुन्हा तक्रार देण्यासाठी गेले असता तेव्हाही तक्रार घेतली नाही. त्यामुळे सोनालीच्या कुटुंबाने सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम कथन केला. तेव्हा रामानंद नगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश डॉ.रोहन यांनी दिले. त्यानुसार पती नरेंद्र सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला देशमुख (रा.परभणी) यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. प्रत्यक्षात ही घटना आत्महत्या नसून खूनच असल्याने खुनाचा गुन्हा दाखल होऊन संशयितांना अटक करावी अशी मागणी गोविंदा चांभार यांनी केली आहे.या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी सुरु आहे, त्यात काही माहिती व पुरावे समोर येतात त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.-अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव