अॅश पाईपांची चोरी, दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 01:13 IST2017-05-09T01:13:05+5:302017-05-09T01:13:05+5:30

दीपनगर सुरक्षा विभागाची कारवाई : ट्रॅक्टरसह पाईप जप्त

Ash Pipe Theft, Two Detained | अॅश पाईपांची चोरी, दोन अटकेत

अॅश पाईपांची चोरी, दोन अटकेत

भुसावळ : दीपनगर प्रकल्पाची राख वाहून नेणा:या पाईपाची चोरी केल्याप्रकरणी सुलतान शहा सलीम शहा (22) व जुबेर शहा फकीर (24, दोन्ही रा़फेकरी) यांना सोमवारी सायंकाळी तालुका पोलिसांनी अटक केली़ 66 हजारांचे पाईप व दोन लाखांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आल़े
8 मे रोजी पहाटे 4़40 वाजता अटकेतील दोन्ही संशयित आरोपी वेल्हाळा बंडातील अॅश वाहून नेण्यासाठी गेलेल्या लोखंडी पाईपची चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आल़े याप्रकरणी दीपनगरचे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी राजेश हरी तळेले  (किन्ही) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ आरोपींच्या ताब्यातून 300 एमएमचे 55 मीटर लांबीचे चार टन वजनाचे व 66 हजार रुपये किमतीचे पाईप व दोन लाख रुपयांचे ट्रॅक्टर (एमएच 19- एएन 0534) जप्त करण्यात आल़े तपास परीवेक्षाधीन सहायक पोलीस उपअधीक्षक मनीष कलवानीया यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहेत़ आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आह़े

Web Title: Ash Pipe Theft, Two Detained