लग्नानिमित्त भुसावळात आलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST2020-12-05T04:25:04+5:302020-12-05T04:25:04+5:30

लग्नानिमित्त भुसावळात आलेले बुलढाणा येथील दाम्पत्य ठार भुसावळ जि. जळगाव : लग्नासाठी भुसावळात आलेल्या बुलढाण्यातील दाम्पत्याच्या दुचाकीला डंपरने कट ...

Arrived in Bhusawal for marriage | लग्नानिमित्त भुसावळात आलेले

लग्नानिमित्त भुसावळात आलेले

लग्नानिमित्त भुसावळात आलेले

बुलढाणा येथील दाम्पत्य ठार

भुसावळ जि. जळगाव : लग्नासाठी भुसावळात आलेल्या बुलढाण्यातील दाम्पत्याच्या दुचाकीला डंपरने कट मारल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास खडका चौफुलीवर घडली. डंपरचालकाला अटक करण्यात आली आहे.

चंद्रकांत जगन्नाथ वराडे (६३ ) आणि संध्या चंद्रकांत वराडे ( ५६ रा. चिखली रोड , बुलढाणा) अशी या ठार झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

वराडे दाम्पत्य हे भुसावळ येथील गडकरी नगरात नातेवाईकांकडे लग्नसमारंभासाठी आले होते. गुरुवार रोजी त्यांनी देना नगरातील नातेवाईकांकडे मुक्काम केला. त्यानंतर सकाळी वराडे हे दुचाकीने (क्र. एम. एच. २८ - ६६७१) खडकारोडने गडकरी नगरकडे जाण्यासाठी निघाले होते. खडकाचौफुली जवळ येताच डंपरचा ( एम . एच. १९ झेड - ३१९२) त्यांच्या दुचाकीला कट लागला. त्यामुळे दुचाकी खाली पडली आणि पती व पत्नी हे डंपरच्या मागील चाकाखाली आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत , सचिन पोळ, संजय भदाणे, कृष्णा देशमुख, रमण सुरडकर ,भालेराव यांच्यासह इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

यासंदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर चालक महेंद्र ब्रिजलाल कोळी (रा. भोरटेक ता. यावल) यास अटक करण्यात आली आहे.

Web Title: Arrived in Bhusawal for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.