पोलीसासह पंटरला लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 22:52 IST2019-10-16T22:52:24+5:302019-10-16T22:52:28+5:30
पहूर, ता.जामनेर : पहूर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या शेंदूर्णी दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह एका पंटरला २१०० रुपयचांची लाच घेताना लाच लुचपत ...

पोलीसासह पंटरला लाच घेताना अटक
पहूर, ता.जामनेर : पहूर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या शेंदूर्णी दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह एका पंटरला २१०० रुपयचांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराच्या कुटुंबाच्या नावे निघालेल्या वॉरंटमध्ये अटक करू नये म्हणून त्या मोबदल्यात शेंदूर्णी दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी गजानन काशिनाथ पवार रा.भडगाव रोड, पाचोरा याने चार हजारांची मागणी १३ रोजी रविवारी तक्रारदाराकडे केली होती. यात तडजोड होऊन २१०० रुपये देण्याचे ठरले.
बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून गजानन पवार व त्याचा खासगी पंटर कडूबा लक्ष्मण पाटील रा.गोंधळपुरा, शेंदुुर्णी या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पहूर पोलिसात वरील दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.