शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानियांविरूद्ध जारी केलेले अटक वॉरंटचे आदेश रावेर न्यायालयाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 22:14 IST

रावेर : स्तनाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रियेमुळे प्रवासात जंतूसंसर्ग होवू नये म्हणून दमानियांच्या वकिलांनी दाखल केला होता अर्ज

रावेर - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी रावेर न्यायालयात दाखल झालेल्या फौजदारी खटल्याचे सुनावणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया या सतत अनुपस्थित राहिल्याने गुरूवारी रावेर न्यायालयाने अंजली दमानियांविरूद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश पारीत केले होते. मात्र, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्यावर मुंबईच्या कोकीळाबेन धीरुभाई अंबानी रूग्णालयात स्तनाच्या कर्करोगाची दोनदा शस्त्रक्रिया केल्याने व त्यांच्या सासू हंसा दमानिया यांनाही लिलावती इस्पितळात दाखल केल्याने त्या रावेर न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित न राहू शकल्याचे परिस्थितीजन्य दस्तऐवज सादर करण्यात आले. त्यांचे वकील सुधीर कुलकर्णी व अॅड दिलीप बोरसे यांनी दाखल केलेल्या अर्जावरून शुक्रवारी (9 फेब्रुवारी) रावेर न्यायालयाने अटक वॉरंटचे जारी केलेले आदेश माघारी घेत असल्याचे आदेश नव्याने पारीत केले आहेत. 

काय आहे नेमके प्रकरण ?भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर जावयाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण आदी विषयांवर खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरूद्ध भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी रावेर न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला होता. याप्रकरणी रावेर न्यायालयाने दोनवेळा समन्स बजावणी करूनही अंजली दमानिया सतत ७ ते ८ सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप मालवीय यांनी गुरुवारी सांताक्रुझ पोलीस स्टेशनला त्यांना तातडीने अटक वॉरंटचे बजावण्यात आले होते.

रावेर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची बदनामी केल्याप्रकरणी मुंबईच्या सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांविरूद्ध रावेर फौजदारी व दिवाणी न्यायालयात भादंवि कलम ४९९ व ५०० अन्वये दि २८ जून २०१६ रोजी फौजदारी खटला क्र ४०० /१६ दाखल केला होता. दरम्यान, अंजली दमानिया यांना रावेर न्यायालयाने प्रोशेस इश्यू करून दोनवेळा समन्स बजावले होते. दरम्यान, गत सात ते आठ सुनावणीसाठी त्या सतत अनुपस्थित राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात यावे, असा विनंती अर्ज भारतीय जनता पार्टीचे वकील चंद्रजित पाटील व तुषार माळी यांनी दाखल केला. या अर्जावर न्यायाधीश दिलीप मालवीय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना वाकोला (सांताक्रूझ) पोलिसांमार्फत अटक वॉरंट बजावण्यासंबंधी आदेश दिले होते.  

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपा