बलात्कार प्रकरणातील फरार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:05 IST2019-12-10T22:05:39+5:302019-12-10T22:05:45+5:30
बुलढाणा व मलकापूर येथून पकडले

बलात्कार प्रकरणातील फरार आरोपींना अटक
बोदवड : येथील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी बुलढाणा व मलकापूर येथून अटक केली आहे.
फैजपूर येथिल विवाहितवर बोदवड येथील तीन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. सदर प्रकारची वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकी ही दिली होती. या प्रकरणी सदर महिलेने बोदवड पोलिसात फिर्याद दिली दिल्यानुसार मुख्य आरोपी सद्दाम कुरेशी याचे नाव सांगितले होते. सदर घटनेनंतर यातील तिघे आरोपी फरार झाले होते, तर त्यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली होती. यात मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, एस. सी. वारुळे, बोदवड पोलीस निरीक्षक सुनील खरे, गोपाळ गव्हाळे, निखिल नारखेडे, राहुल जोहरे, उद्दल चव्हाण, महेंद्र लहासे, मनोज पाटील आदींनी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, तसेच बुलढाणा या दोन्ही ठिकाणी लपलेले आरोपी सद्दाम कुरेशी, इम्रान शेख उर्फ इम्मू, आबीद बिस्मिल्ला या तिघांना सापळा लावून पकडले व बोदवड येथे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिन्ही आरोपीना १३ तारखेपर्यत पोलीस कोठडी दिली, अशीमाहिती पो. नि. सुनील खरे यांनी दिली.