दर्शनासाठी ऑनलाइन व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:23+5:302021-09-04T04:21:23+5:30
वाद्यवृंद पथकांच्या कार्यक्रमांचा विचार होणार - डॉ. प्रवीण मुंढे गणेश मंडळाना कमीत कमी कागदपत्रांमध्ये आवश्यक ती परवानगी देण्यात येईल, ...

दर्शनासाठी ऑनलाइन व्यवस्था करा
वाद्यवृंद पथकांच्या कार्यक्रमांचा विचार होणार - डॉ. प्रवीण मुंढे
गणेश मंडळाना कमीत कमी कागदपत्रांमध्ये आवश्यक ती परवानगी देण्यात येईल, यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येऊन गणेश मंडळांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी दिली. यावर्षीचा गणेशोत्सव हा भक्तिमय वातावरणात आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यासह जिल्ह्यातील वाद्यवृंद पथकांना त्यांचे कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यासाठी शहरातील मोकळ्या जागेत त्यांचे कार्यक्रम घेऊन त्याचे लाईव्ह सादरीकरणाबाबत विचार करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी सांगितले.
यंदा रोजगारोत्सव
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सचिन नारळे यांनी मंडळाची भूमिका, कार्यपध्दती व स्थापना आणि विर्सजनाबाबतची भूमिका सांगितले. गणेश मंडळांच्या ठिकाणी एक वही ठेवण्यात येणार असून ज्यांना रोजगार हवा त्यांनी त्यात नोंद करावी व जे रोजगार देऊन इच्छितात त्यांनीही त्यात नोंद करावी, असे आवाहन करीत या माध्यमातून रोजगारोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व स्वच्छता, विजेच्या तारांजवळील झाडांच्या फांद्या काढणे, यासारख्या सूचना करीत वाद्य, लेझीम पथकाला परवानगी मिळण्याची मागणी केली. बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली.