तापी पतपेढी अपहारप्रकरणी युक्तिवाद सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:22 IST2019-09-21T21:22:37+5:302019-09-21T21:22:41+5:30
अमळनेर : तापी सहकारी पतपेढी अपहार प्रकरणी आरोपी पंकज बोरोले यांच्या जामीन अर्जावर सोमवारी युक्तिवाद होणार आहे. तापी पतपेढीच्या ...

तापी पतपेढी अपहारप्रकरणी युक्तिवाद सोमवारी
अमळनेर : तापी सहकारी पतपेढी अपहार प्रकरणी आरोपी पंकज बोरोले यांच्या जामीन अर्जावर सोमवारी युक्तिवाद होणार आहे.
तापी पतपेढीच्या अपहार प्रकरणात पंकज बोरोले यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. मात्र मुदतीच्या आत आरोपपत्र दाखल न झाल्याने तांत्रिक त्रुटींचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी अमळनेर येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर २१ रोजी सुनावणी होणार होती मात्र न्यायालयाने युक्तिवाद २३ रोजी ठेवला आहे.