महावीर जैनच्या जामीन अर्जावर युक्तिवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:09+5:302021-03-25T04:17:09+5:30
बीएचआर : कंडारेच्या अर्जावर ३० रोजी कामकाज जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूक प्रकरणात अटकेतील संशयित आरोपी ...

महावीर जैनच्या जामीन अर्जावर युक्तिवाद
बीएचआर : कंडारेच्या अर्जावर ३० रोजी कामकाज
जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूक प्रकरणात अटकेतील संशयित आरोपी महावीर जैन याच्या जामीन अर्जावर बुधवारी पुणे न्यायालयातील न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात युक्तिवाद झाला तर अवसायक जितेंद्र कंडारे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ३० मार्च रोजी कामकाज होणार आहे.
महावीर जैन, विवेक ठाकरे याच्यासह पाच संशयितांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावातून अटक केली आहे. दहा दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर जैनसह सर्वजणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातील कमलाकर कोळी या एका संशयितास नंतर न्यायालयाने जामीनावर मुक्त केले. तर इतर सर्वजण अद्याप कारागृहात आहेत. दरम्यान, जैन याने जामीनासाठी पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर बुधवारीयुक्तिवादास सुरूवात झाली. तर बेपत्ता संशयित आरोपी जितेंद्र कंडारे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ३० मार्च रोजी सुनावणी होणार आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण काम पाहत आहेत.
--------