शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
5
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
6
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
7
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
8
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
9
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
11
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
12
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
13
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
14
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
15
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
16
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
17
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
18
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
19
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
20
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत

ट्रकचा कट लागल्यावरुन वाद झाला अन‌् दुचाकी चोरीचा भांडाफोडा झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 19:47 IST

संशयितला अटक : वाद नंदूरबारात दुचाकी चोरली जळगावात

जळगाव : नंदूरबारमध्ये ट्रकचा दुचाकीला कट लागल्यानंतर ट्रक चालक व दुचाकीस्वारात वाद झाला. प्रकरण पोलिसात गेले अन‌् तेथे दुचाकी चोरीचा भांडाफोड झाला. श्रीकांत प्रकाश मोरे (२४, रा.अमळगाव, ता.अमळनेर) असे चोरट्याचे नाव असून जिल्हा पेठ पोलिसांनी त्याला नंदूरबारमधून अटक केली. दरम्यान, सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. श्रीकांत याने जिल्हा क्रीडा संकुलाच्या पार्कींगमधून दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत मोरे हा नंदूरबारमध्ये दुचाकीने (क्र.एम.एच.१५ बी.एच.४५३३) जात असताना रविवारी ट्रकचा कट लागल्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. पोलिसांनी हे भांडण सोडविले, मात्र भांडणानंतरही श्रीकांत याने ट्रकचालकाला पुढे चल तुला बघून घेतो, अशी धमकी दिली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून नंदुरबार तालुका पोलिसांनी श्रीकांत मोरे यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी त्याच्याकडील दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. बोलण्यातच संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने ही दुचाकी चोरीची असल्याची सांगून जळगाव शहरातील जिल्हा क्रिडा संकुलाच्या पार्किंगमधून चोरल्याची कबुली दिली. नंदुरबार पोलिसांनी जिल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधून तुमच्या हद्दीत चोरी झालेली दुचाकी जप्त केली असल्याचे सांगितले. त्यानुसार कर्मचारी प्रविण भोसले, हेडकॉन्स्टेबल विजय सोनार यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गाठून संशयित श्रीकांत मोरे यांच्यासह दुचाकी ताब्यात घेतली. दरम्यान श्रीकांत यास अटक केल्यावर जिल्हापेठ पोलिसांनी सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.क्रीडा संकुलासमोरुन चोरली दुचाकीविनयकुमार अक्षयकुमार जोशी (वय ५६, रा. नेहरुनगर) हे छत्रपती शिवाजी क्रिडा संकुल येथे एका फर्ममध्ये कामाला आहेत.२३ ऑक्टोंबर रोजी जोशी हे कार्यालयात आले. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी कार्यालयाच्या बाहेर पार्किंग केली. काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता, दुचाकी गायब होती. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून आल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी जोशी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव