पथराड येथे रेशन दुकानदाराची मनमानी, तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST2021-09-19T04:17:46+5:302021-09-19T04:17:46+5:30

गुढे, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या पथराड येथील रेशन दुकानदार मनमानी करीत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्याविरोधात ...

Arbitrariness of ration shopkeeper at Pathrad, complaint | पथराड येथे रेशन दुकानदाराची मनमानी, तक्रार

पथराड येथे रेशन दुकानदाराची मनमानी, तक्रार

गुढे, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या पथराड येथील रेशन दुकानदार मनमानी करीत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्याविरोधात तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे.

रेशन माल घेण्यासाठी दुकानावर गेलो असता रेशन दुकानदार त्याच्या घरीच मशीनवर आमच्याकडून अंगठा घेऊन आम्हांला शासनाच्या निर्देशापेक्षा कमी माल देत आहे. याशिवाय दुकानातून रेशनमाल घेतल्याची पावती रेशन दुकानदार आम्हांला देत नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.

रेशन दुकानात आलेल्या मालाची नोंद तसेच मालाचा दर (भाव) असलेला फलक लावावा असे निर्देश असताना दुकानदार ते लावत नाही.

याबाबत या रेशन दुकानदाराची त्वरित चौकशी होऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Arbitrariness of ration shopkeeper at Pathrad, complaint