एरंडोलला विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 20:35 IST2019-07-19T20:33:59+5:302019-07-19T20:35:10+5:30

कारण अस्पष्ट : फौजी पती आला होता सुटीवर

Arandol gets married to suicide | एरंडोलला विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एरंडोलला विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


एरंडोल : येथे गांधीपुरा भागात रत्नाबाई तुळशीराम साळी (वय ४८ ) या महिलेनी तिच्या राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना १९ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली.
घरातील मधल्या खोलीमध्ये दरवाजास सुती दोरीने गळफास घेऊन रत्नाबाईने आत्महत्या केली. हा प्रकार काही वेळाने निदर्शनास आला. मात्र सदर महिलेने आत्महत्या का केली असावी? या प्रश्नाचा उलगडा अद्याप होवू शकला नाही.
एरंडोल येथील तुळशीराम राजाराम साळी हे बी.एस.एफ.मध्ये नागालॅण्ड येथे फौजी म्हणुन सेवेत आहेत. त्यांचे कुटुंब येथील गांधीपुरा भागात यशोदीप चौकात वास्तव्यास आहे.
सदर जवान दोन महिन्याची राजा घेऊन घरी आले होते. शुक्रवारी ते घराबाहेर गेले असतांना त्यांची पत्नी रत्नाबाई साळी यांनी घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एरंडोल पो. स्टे. चे हेड कॉन्स्टेबल भिमराव मोरे, सुनिल लोहार, अकिल मुजावर, संदीप सातपुते हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.

Web Title: Arandol gets married to suicide