पकडलेल्या गायींना खावटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:19 IST2021-05-25T04:19:12+5:302021-05-25T04:19:12+5:30

गोसेवक ॲड. शर्मा यांनी केली होती याचिका दाखल पाचोरा : अवैध वाहतुकीत पकडलेल्या पाच गायींना संबंधित व्यापाऱ्याने ...

Approved scythe to the caught cows | पकडलेल्या गायींना खावटी मंजूर

पकडलेल्या गायींना खावटी मंजूर

गोसेवक ॲड. शर्मा यांनी केली होती याचिका दाखल

पाचोरा : अवैध वाहतुकीत पकडलेल्या पाच गायींना संबंधित व्यापाऱ्याने रोज प्रत्येकी ७५ रुपये खावटी द्यावी, असा निकाल पाचोरा येथील न्या. एफ. सिद्दीकी यांनी दिला आहे. या गायी सध्या आरवे येथील गोशाळेत आहेत.

एका वाहनातून गायींची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोरक्षा समिती सदस्य हेमंत गुरव याने पोलिसांना दिली. यावरून हे वाहन पाचोरा पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर, या पाच गायींना आरवे येथील गोपाळकृष्ण शर्मा यांच्या गोशाळेत

दाखल करण्यात आले. या गायींच्या पालनपोषणासाठी त्यांना खावटी मिळावी म्हणून पाचोरा येथील गोसेवक ॲड. चंद्रकांत शर्मा यांनी पाचोरा न्यायालयात अपील दाखल केले. पाचोरा येथील न्या. एफ. सिद्दीकी यांनी हे अपील मान्य करीत पाच गायींना प्रत्येकी प्रतिदिवस रु ७५ प्रमाणे खावटी व्यापारी जावेद खालीद कुरेशी याने गोशाळेस देण्याचा आदेश दिला.

दरम्यान, खावटीची रक्कम आणखी वाढवून मिळावी, यासाठी ॲड. शर्मा यांनी जळगाव येथील सेशन कोर्टात अपील दाखल केले आहे. त्यात गायींच्या पालनपोषणासाठी प्रत्येक गायीमागे प्रतिदिन ३०० रुपये खावटी मिळावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Approved scythe to the caught cows