रमाई आवास योजनेच्या ४० प्रस्तावांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:06+5:302020-12-04T04:46:06+5:30
जळगाव : अनुसूचित जातीच्या व नवबौध्द घटकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांपैकी रमाई ...

रमाई आवास योजनेच्या ४० प्रस्तावांना मंजुरी
जळगाव : अनुसूचित जातीच्या व नवबौध्द घटकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांपैकी रमाई आवास घरकुल योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत ४० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत अध्यक्षस्थानी होते. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील आठ नगरपालिका व नगरपंचायतीमार्फत सादर केलेल्या एकूण ४० घरकुलांना समितीने मान्यता दिली.
जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींनी घरकुलाचे दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. या मोहिमेतून लाभार्थ्यांचा शोध घेवून या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.