जिल्ह्यातील १२ कोटींच्या कामांना नाविन्यपुर्ण योजनेतून मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:11+5:302021-05-05T04:27:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मार्च २०२१ अखेरीस जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी ...

जिल्ह्यातील १२ कोटींच्या कामांना नाविन्यपुर्ण योजनेतून मान्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मार्च २०२१ अखेरीस जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात १० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. शहरी विभागात ८ अग्निशमन गाड्यांच्या खरेदीसाठी २ कोटी ३१ लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
यात धरणगाव, पाचोरा, भडगाव, चोपडा, पारोळा, अमळनेर, जामनेर, शेंदुर्णी या ठिकाणी प्रत्येकी सुमारे ३० लाख या प्रमाणे दोन कोटी ३१ लाख रुपयांचा निधी लहान अग्निशमन वाहनांसाठी मंजूर केला आहे. या वाहनांची लवकरच खरेदी केली जाणार आहे.
या कामांसाठी निधी मंजूर
बहुद्देशीय डिजीटल दवंडी यंत्रणा, अभ्यासिका बांधकाम, महिला बचतगटासाठी सभागृह, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर ऑडीट, स्मशानभुमी, सिमेंटची बाके, रस्ते, नदी-नाल्यांवर संरक्षक भिंतीचे बांधकाम, शव पेट्या, गाव हाळ ,ओपन जिम व लोखंडी बाक व सार्वजनिक शौचालय बांधकामांचा समावेश आहे.