ई.वायुनंदन रुजू होताच होईल प्र-कुलगुरू, अधिष्ठतांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:42+5:302021-03-04T04:28:42+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या राजीनाम्यानंतर प्र-कुलगुरू व अधिष्ठाता पद सुध्दा संपुष्टात आले ...

ई.वायुनंदन रुजू होताच होईल प्र-कुलगुरू, अधिष्ठतांची नियुक्ती
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या राजीनाम्यानंतर प्र-कुलगुरू व अधिष्ठाता पद सुध्दा संपुष्टात आले आहे. येत्या सोमवारी प्रभारी कुलगुरू म्हणून ई.वायुनंदन पदभार स्वीकारणार असून त्यानंतर प्रभारी प्र-कुलगुरू व अधिष्ठाता यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
प्रा.पी.पी.पाटील यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ ऑक्टोंबर महिन्यात संपणार होता. परंतु, त्यांनी कार्यकाळ संपण्याच्या आठ महिन्याआधीच कुलगुरू पदाचा अचानक राजीनामा दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचा राजीनामा मंजूरही केला असून त्यांचा पदभार हा प्रभारी स्वरूपात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई.वायुनंदन यांच्याकडे सोपविला आहे. विशेषत: कुलगुरूंच्या राजीनाम्यानंतर विद्यापीठातील प्र-कुलगुरू व अधिष्ठातापद सुध्दा संपुष्टात आलेले आहे. ८ मार्चला ई.वायुनंदन हे प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे लागलीच प्रभारी प्र-कुलगुरू व अधिष्ठाता यांची नियुक्ती केली जाईल. एप्रिल किंवा मे महिन्यात कुलगुरू निवडीची प्रक्रियेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रभारी प्र-कुलगुरू पदाचा पदभार कुणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.