गजानन वंजारी यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:16+5:302021-08-21T04:21:16+5:30
निवारा केंद्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी जळगाव : श्री संत गाडगे बाबा शहरी बेघर निवारा केंद्र व गुजराती समाज महिला ...

गजानन वंजारी यांची नियुक्ती
निवारा केंद्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी
जळगाव : श्री संत गाडगे बाबा शहरी बेघर निवारा केंद्र व गुजराती समाज महिला मंडळ, मानव अधिकार मिशन सेवाधर्म ग्रुप यांच्याकडून आर.एल. हॉस्पिटल येथे बेघर निवारा केंद्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी राज ऐश्वर्य मनीष जैन, अनिल पगारिया, विजय मराठे, भावना चौहान, रंजना पटेल, कीर्ती चौहान, डाॅ. रोहित पाटील, मुकेश चव्हाण, संस्थेचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजी वाहक राजेंद्र मराठे, दीपक चौधरी, किरण मोरे यांचे सहकार्य लाभले.
काँग्रेसच्या वतीने सद्भावना दिन साजरा
जळगाव : जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन साजरा करण्यात आला. माजी शहर अध्यक्ष डॉ. ए. जी. भंगाळे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, सेवादल शहर कार्याध्यक्ष महेंद्र सिंग पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी विजय वाणी, दाणेश्वर कोळी, महेंद्र पाटील, जगदीश गाढे, नदीम काझी, शशी तायडे, नितीन पाटील, मनोज सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.