प्रभारी कुलसचिवपदी भादलीकर यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST2021-03-28T04:16:19+5:302021-03-28T04:16:19+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. एस.आर. भादलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही ...

प्रभारी कुलसचिवपदी भादलीकर यांची नियुक्ती
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. एस.आर. भादलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रभारी कुलसचिव पदावर प्रा. ए.बी. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांचा प्रभारी कुलसचिवपदाचा तात्पुरता पदभार हा डॉ. एस.आर. भादलीकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन यांनी ही नियुक्ती केली आहे. डॉ. एस. आर. भादलीकर हे उपकुलसचिव विधि व माहितीचा अधिकार या विभागाचे विभागप्रमुख आहेत.
शासकीय वाहन नाकारले
प्रभारी कुलसचिव पदावर असताना तोपर्यंत कुठलेही बेकायदेशीर काम होऊ देणार नाही. जे कायद्यात बसेल ते होईल व प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, कुलसचिवाला कायद्यानुसार वाहन नसल्यामुळे भादलीकर यांनी पदभार स्वीकारताच, शासकीय वाहन सुद्धा नाकारले.