आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २२: हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस उपनिरीक्षकपदी तात्पुरती पदोन्नती दिलेल्या राज्यातील दीड हजार कर्मचा-यांना त्यांच्या मुळ पदावर जाण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील १८ उपनिरीक्षकांना बसला आहे. फौजदाराची टोपी, काठी व कमरेला रिव्हॉल्वर लावून फिरणा-या या अधिका-यांना मुळ पदावर पाठविल्यामुळे एक प्रकारे शासनाने अपमानच केल्याची भावनी या अधिका-यांमध्ये निर्माण झाली आहे.आवश्यक व तातडीची सेवा म्हणून पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदावर पात्र असलेल्या हवालदार ते सहायक उपनिरीक्षकांना दर तीन महिन्यासाठी शासनाने उपनिरीक्षक पदावर पदोन्नती केली होती. दर तीन महिन्यांनी या कर्मचा-यांना मुदतवाढ देण्यात येत होती. जिल्ह्यातील १९ जणांना दोन ते तीन वर्षापासून मुदत वाढ मिळत होती. दरम्यान, यातील अनेक जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत तर जळगाव उपअधीक्षक कार्यालयातील अशोक वानखेडे हे दोन महिन्यापूर्वीच निवृत्त झाले आहेत. तरी देखील त्यांचे नाव या १८ जणांच्या यादीत आहे.या अधिका-यांना केले पदावनत गिरधर वेडू निकम (जिल्हा पेठ), अशोक विश्वनाथ वानखेडे (पोलीस उपअधीक्षक कार्यालय, जळगाव), प्रकाश सखाराम इंगळे (स्थानिक गुन्हे शाखा), मिलिंद आत्माराम इंगळे (मुख्यालय), फकीरखा रमजानखा तडवी (सावदा), संजय सदाशिव पंजे (चाळीसगाव शहर), शैला प्रकाश पाचपांडे (बाजारपेठ, भुसावळ), प्रकाश भास्कर बरडे (भुसावळ बाजार पेठ), राजेश देवराम वणीकर (शहर वाहतूक शाखा, भुसावळ), नेताजी पंडित वंजारी (रावेर),सुरेंद्र सुभानराव इंगळे (मुख्यालय), सुरेश माणिकराव वैद्य (भुसावळ तालुका), सतीश सुकलाल जोशी (शहर वाहतूक शाखा, जळगाव), राजू सदाशिव पंजे (मुख्यालय), अ.गफ्फार शेख हैदर शेख (जिल्हा पेठ), प्रकाश गणसिंग पाटील (जळगाव तालुका), अरुण गणेश जोशी (मुख्यालय) व अंबादास नारायण पाथरवट (बोदवड) यांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील १८ पोलीस उपनिरीक्षकांची पुन्हा हवालदार, जमादारपदी नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:06 IST
हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस उपनिरीक्षकपदी तात्पुरती पदोन्नती दिलेल्या राज्यातील दीड हजार कर्मचा-यांना त्यांच्या मुळ पदावर जाण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील १८ उपनिरीक्षकांना बसला आहे. फौजदाराची टोपी, काठी व कमरेला रिव्हॉल्वर लावून फिरणा-या या अधिका-यांना मुळ पदावर पाठविल्यामुळे एक प्रकारे शासनाने अपमानच केल्याची भावनी या अधिका-यांमध्ये निर्माण झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील १८ पोलीस उपनिरीक्षकांची पुन्हा हवालदार, जमादारपदी नियुक्ती
ठळक मुद्दे शासनाकडून पदावनत राज्यातील दीड हजार कर्मचा-यांची निराशा शासन अपमानित करीत असल्याची भावना