जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत दाखविल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.
राज्यात शिरपूर पॅटर्न राबवू
शून्य व्याजाचे कर्ज हवे
महसूलमंत्री : कुणालाही अडविता येईल पाणी
जळगाव : जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत दाखविल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. शहरात मेहरूण तलावाच्या विकासकामांच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खडसे म्हणाले, जलसंधारणासंबंधी मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात कृषी विभागाच्या अधिकार्यांनी कामाची योजना तयार असल्याचे सांगितले. या बैठकीत यापुढे कुणा शेतकर्याला किंवा इतरांना शेतानजीक, नाल्यावर पाणी अडवायचे असल्यास त्यांना विनाअट परवानगी दिली जावी, असा निर्णय झाला. तसा आदेश लवकरच काढला जाईल. पाणी अडविणार्यांना शासनही मदतीचा हात देईल. यंत्रणा किंवा इंधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. जलसंधारणासाठी गाळ काढण्याची मोहीम गतिमान होईल यासाठी कुणालाही तलाव, नाले व प्रकल्पांमधील गाळ काढता येईल. शेतीसह कुंभार मंडळी किंवा इतरांना त्या गाळाचा वापर करता येईल. लहान बंधार्यांचे खोलीकरण केले जाईल, असेही ते म्हणाले.
-------------
राज्य व केंद्र शासन कर्जात बुडालेले आहे. शासनाकडे पैसा नाही. तीन लाख २५ हजार कोटींचे कर्ज राज्य सरकारवर आहे. या स्थितीत शून्य टक्के व्याजाने पैसा उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न राहील. संस्थांचे सहकार्य घेतले जाईल, असेही ते म्हणाले.