दीपस्तंभ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ११५७ विद्यार्थ्यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:07+5:302021-09-24T04:20:07+5:30
जळगाव : दीपस्तंभ फाऊंडेशनच्या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियान अंतर्गत आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला असून, ...

दीपस्तंभ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ११५७ विद्यार्थ्यांचे अर्ज
जळगाव : दीपस्तंभ फाऊंडेशनच्या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियान अंतर्गत आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला असून, परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १,१५७ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे.
दीपस्तंभ फाऊंडेशनच्या जळगाव, पुणे आणि औरंगाबाद या परीक्षा केंद्रांवर मंगळवारी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून १,१५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरम्यान, या परीक्षेतून उत्तीर्ण ३०० विद्यार्थ्यांची मेरिटनुसार निवड केली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना दीपस्तंभ फाऊंडेशनच्या अंतर्गत एका वर्षाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व आवश्यकतेनुसार विनामूल्य निवास व भोजन सुविधेसाठी सहाय्य केले जाते. तसेच मुलाखतीतून पात्र दिव्यांग, प्रज्ञाचक्षू, अनाथ आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मनोबल प्रकल्पांतर्गत विविध स्पर्धा परीक्षां संदर्भात विविध कोर्सेससाठी सहाय्य केले जाते. या परीक्षेसाठी प्रा. यजुवेंद्र महाजन, प्रकल्पप्रमुख म्हणून आर. डी. पाटील, पंडितराव गावंडे, योगेश सूर्यवंशी, अनुप चौधरी, महेंद्र पाटील, योगिता महाजन, सीमा महाजन, सचिन पाटील, पूर्वा जाधव आदींनी परिश्रम घेतले.