स्मशानभूमीचे रूप पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:57+5:302021-07-09T04:11:57+5:30
भुसावळ : येथील तापी नदीकाठावरील स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था बनली होती. पावसाळ्यात व उन्हाळ्यात येथे उभेही राहता येत नव्हते. ...

स्मशानभूमीचे रूप पालटले
भुसावळ : येथील तापी नदीकाठावरील स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था बनली होती. पावसाळ्यात व उन्हाळ्यात येथे उभेही राहता येत नव्हते. ‘लोकमत’ने ही बाब प्रकर्षाने मांडली होती. याची दखल आमदार संजय सावकारे यांनी घेतली व स्मशानभूमीचा चेहरामोहरा बदलला.
सावकारे यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आणि विविध कामे केली. स्मशानभूमीत येणाऱ्या रस्त्यावर शेड टाकले, तसेच विसाव्यासाठी पण शेड उभारण्यात आले. दशक्रिया विधीसाठी हॉल बनविण्यात आला. त्यामुळे एकाचवेळी तीन दशक्रिया विधी करता येतील अशी जागा उपलब्ध झाली आहे. प्लॅटफाॅर्म दीडशे फूट लांब व वीस फूट रुंदीचा तयार करण्यात आला आहे. शेडही बनवण्यात आले आहे, अशी माहिती चतुर्भूज कन्स्ट्रक्शनचे संचालक योगेश वासुदेव पाटील यांनी दिली.
परिसर केला सुशोभित
याचबरोबर अंत्ययात्रेत येणाऱ्यांसाठी ४० बेंचेस बसविण्यात येणार आहेत. परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून स्मशानभूमी परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. जागोजागी डस्टबीन ठेवल्या आहेत.