घरगुती कामगारांची नोंदणी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:10+5:302021-07-01T04:13:10+5:30
परिवहन विभागातर्फे तालुकानिहाय शिबिर जळगाव : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत जिल्ह्यातील नागरिकांसाठी दरमहा तालुकानिहाय मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येते. ...

घरगुती कामगारांची नोंदणी करण्याचे आवाहन
परिवहन विभागातर्फे तालुकानिहाय शिबिर
जळगाव : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत जिल्ह्यातील नागरिकांसाठी दरमहा तालुकानिहाय मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येते. जुलैपासून प्रशासकीय कारणास्तव या शिबिर दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. अमळनेर - पहिला मंगळवार, जामनेर- दुसरा बुधवार, पाचोरा- पहिला सोमवार व चौथा सोमवार, भुसावळ- पहिला, तिसरा व चौथा गुरुवार, चाळीसगाव- पहिला, दुसरा, चौथा व पाचवा शुक्रवार, यावल - तिसरा सोमवार, सावदा - पहिला बुधवार, चोपडा- दुसरा सोमवार, रावेर - दुसरा मंगळवार, बोदवड - चौथा मंगळवार, भडगाव - चौथा बुधवार, पारोळा - तिसरा शुक्रवार व पाचवा गुरुवार, मुक्ताईनगर - तिसरा मंगळवार, वरणगाव - दुसरा गुरुवार असा बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.