शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

प्रेषित : समतेचे आचार्य आणि बंधूभावाचे प्रचारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 20:20 IST

१० नोव्हेंबर ईस्लामी तिथीप्रमाणे १२ रबीऊल अव्वल अर्थात प्रेषित हजरत मुहम्मद (स.अ.) यांची जयंती, ईद ए मिलादुन्नबी म्हणून ती ...

१० नोव्हेंबर ईस्लामी तिथीप्रमाणे १२ रबीऊल अव्वल अर्थात प्रेषित हजरत मुहम्मद (स.अ.) यांची जयंती, ईद ए मिलादुन्नबी म्हणून ती जगभरात साजरी केली जाते.प्रसिद्ध इतिहासकार मायकल एच. हार्ट यांनी जगाच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली ठरलेल्या १०० व्यक्तिमत्वाची अभ्यासपूर्ण यादी ‘द हंड्रेड’च्या नावाने प्रसिध्द केली आहे. यात यादीत पहिले स्थान प्रेषित मुहम्मद यांना देण्यात आले आहे. यावर स्पष्टीकरण तो म्हणतो, मी केलेल्या प्रेषित मुहम्मदांच्या निवडीने काहींना आश्चर्य झाले असून आणि काहींना प्रश्न पडले असतील; परंतु प्रेषित मुहम्मंद इतिहासातील एकमात्र व्यक्तिमत्व आहेत, जे धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष दोन्ही मैदानात एकाचवेळी सरस ठरले आहेत.प्रेषित मुहम्मद यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यवहारिक संदेश दिला. केवळ २३ वर्षाच्या कालावधीत त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन करून जगाला दाखवला. बिलाल नावाच्या तुच्छ समजल्या जाणाऱ्या गुलामाला काबागृहावर चढून अजाण देण्याचा आदेश देऊन कोणतीच व्यक्ती अपवित्र नसल्याचा संदेश प्रेषितांनी दिला आणि स्पष्ट केले की, आजपासून रानटीपणाच्या सर्व प्रथा आणि परंपरा मी माझ्या पायदळी तुडवित आहे. कोणाला कोणावर कसलेही प्रभुत्व नसून सर्व समान आहेत. एकाच मानवाची संतान आहेत.’ सर्वांना एकाच मानवाची संतान मानणे इस्लामच्या मुलभूत सिध्दांतापैकी आहे. जन्म, रंग, वर्ण, वंशाच्या आधारावर केला जाणारा भेद इस्लामला मान्य नाही. सर्वांना समान हक्क, समान संधीची घोषणा प्रेषितांनी १४०० वर्षांपूर्वी केली आणि समानतेवर आधारित समाजाची स्थापना या जगाला करून दाखवली. प्रेषित मुहम्मद समतेचे आचार्य आणि मानवजातीतील बंधूभावाचे प्रचारक होते.प्रेषित मुहम्मंदांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान अधिकार देऊन टाकले. प्रेषित मुहम्मंदानी आईला हा दर्जा दिला की, धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला आणि ‘जन्नत मां के कदमो के नीचे’ असल्याची शिकवण दिली. पत्नीला हा दर्जा दिला की, तुमच्यापैकी सर्वोत्तम तो आहे. तो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे. मुलीला हे स्थान दिले की, ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पध्दतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल, अशी शिकवण प्रेषितांनी दिली.व्याजाच्या शापाने ग्रस्त झालेल्या समाजाला प्रेषितांनी सावकारी पाशातून मुक्त करून व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश दिला आणि केवळ १० वर्षाच्या कालखंडात व्याजमुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित करून दाखवली. अरब समाजात लोक सावकारी एक भयंकर पाप समजू लागले. केवळ व्याजाच्या नावाने सावकार थरथर कापू लागले. आपल्याकडे अधिक असलेली रक्कम लोक स्वत: दान करू लागले. पैसे उधार देऊन सोडून देऊ लागले. गरिबांना आणि गरजूंना मागण्याची परिस्थितीच कधी प्रेषितांनी येऊ दिली नाही. अरब प्रदेश पाहता पाहता आर्थिकदृष्ट्या इतका सधन संपन्न झाला की, ज्याच्या आधारे अरब समाजातून दारिद्रीचा नाश झाला.प्रत्येक मुस्लिमसाठी शिक्षण प्राप्त करणे अनिवार्य असल्याचा आदेश प्रेषितांनी दिला. आपल्या अनुयायांवर शिक्षणाची सक्ती केली. याप्रकारे प्रेषितांनी मुस्लिम समाजाला प्रत्येक क्षेत्रात केवळ १० वर्षाच्या कालखंडात अग्रेसर करून ठेवले. प्रेषित मुहम्मद जगातील इतिहासात सर्वाधिक प्रभुत्वशाली व्यक्तिमत्व होते. आपल्या सिध्दांताच्या माध्यमातून ते जगावर आपल्या ‘न भूतो न भविष्यती’ प्रभाव टाकला आहे.- काझी मुजम्मीलोद्दीन नदवी,सहाय्यक प्राध्यापक, एच. जे. थिम महाविद्यालय, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव