गोंडगाव रस्त्यावर पाण्यासाठी व्याकूळ हरणाचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: June 29, 2017 15:59 IST2017-06-29T15:59:50+5:302017-06-29T15:59:50+5:30
गोंडगाव मार्गावर 28 रोजी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत 6 ते 7 महिने वयाच्या हरणाचा मृत्यू झाला.

गोंडगाव रस्त्यावर पाण्यासाठी व्याकूळ हरणाचा अपघाती मृत्यू
ऑनलाईन लोकमत
कजगाव ता. भडगाव,दि.29- गोंडगाव मार्गावर 28 रोजी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत 6 ते 7 महिने वयाच्या हरणाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे वॉचमन नाना पाटील तसेच इतरांनी पंचनामा करून मृत हरीण अंत्यविधी साठी सोबत नेले.
कजगाव- गोंडगाव मार्गावर टेकडी परिसर असून वनविभागाचे ओस पडलेले जंगल आहे. या भागात प्राण्यांचा वावर नेहमीचा आहे . पाण्याच्या शोधात हे प्राणी रात्री बाहेर पडतात, मात्र वनविभागाकडून या प्राण्यांना पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. या संपूर्ण भागात कुठेही पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात प्राण्याचा जीव जातो. या बाबीचा वन विभागाने विचार करून तात्काळ प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.