ॲन्टीजन तपासणी केंद्र सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST2021-03-28T04:15:55+5:302021-03-28T04:15:55+5:30
या तपासणी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, ...

ॲन्टीजन तपासणी केंद्र सुरु
या तपासणी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा उपस्थित होते.
रेडक्रॉस सोसायटीच्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. हे तपासणी केंद्र शहराच्या मध्यभागी म्हणजेच महानगरपालिका संचलित सानेगुरुजी वाचनालयातील टेबल टेनिस हाॅल, शासकीय रुग्णालयाच्या मागे सुरु झाले असून तपासणी पूर्णपणे विनामूल्य आहे.
रविवारीदेखील सेवा
सद्य परिस्थितीत शासकीय यंत्रणेवर खूप मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे आणि रुग्णांची तपासणी लवकर झाल्यास उपचार लवकर करणे शक्य होईल. या सर्व बाबींचा विचार करून या केंद्रात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सेवा देण्यात येणार आहे. रविवारी देखील ही सेवा सुरु राहणार आहे. या तपासणी केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.