आसोदा येथे ग्रामपंचायततर्फे अॅण्टीजन तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:06+5:302021-03-25T04:17:06+5:30
सध्याच्या काळात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती घाबरून जीवन जगत आहे. केव्हा काय होईल कोण जाणे. ...

आसोदा येथे ग्रामपंचायततर्फे अॅण्टीजन तपासणी शिबिर
सध्याच्या काळात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती घाबरून जीवन जगत आहे. केव्हा काय होईल कोण जाणे. सध्याच्या काळात जीवन कसे जगता येईल व हा विषाणू हळूहळू सगळीकडे पाय पसरतो आहे. या अनुषंगाने येथील आरोग्य केंद्राच्यावतीने डॉ.एन.आर.चौधरी, आरोग्य सेवक रमेश सपकाळे,विजय बाविस्कर, आशा स्वयंसेविका निलीमा धांडे या संपूर्ण टिमने गावात अॅण्टीजन तपासणी मोहिम सुरु केलेली आहे. बुधवारी जवळपास ८० स्त्री, पुरुष यांची तपासणी झाली. परंतु सर्व अहवाल निगेटिव्ह आले. यावेळी सागर कोळी, तुषार कोळी, महेंद्र कोळी, दिपक पाटील, लखन चौधरी, किरण माळी, राजेंद्र चव्हाण, आकाश कोळी, भावेश कोल्हे, गजानन मिस्तरी, भोला सपकाळे व गावातील जेष्ठ मंडळी व भगिनी उपस्थित होत्या.