ॲन्टीजन तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST2021-06-02T04:13:39+5:302021-06-02T04:13:39+5:30

किराणा किटचे वाटप जळगाव : नाभिक समाजातील, टपरीधारक, सलून कारागीर यांना नाभिक समाज जिल्हा संघाकडून किराणा किटचे वाटप करण्यात ...

Antigen testing camp | ॲन्टीजन तपासणी शिबिर

ॲन्टीजन तपासणी शिबिर

किराणा किटचे वाटप

जळगाव : नाभिक समाजातील, टपरीधारक, सलून कारागीर यांना नाभिक समाज जिल्हा संघाकडून किराणा किटचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष कांतीलाल वाघ, उपाध्यक्ष नाना वाघ, सचिव जगन्नाथ परवरे, कृष्णा अहिराणे, जयदेव मावळे, संतोष खोंडे, अनिल तळेले, धनराज शिंदे, राजेंद्र क्षिरसागर, सुभाष वाघ, चिंतामण शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. फोटो आहे.

उज्ज्वला ब्राम्हणकर सेवानिवृत्त

जळगाव : सरस्वती विद्यामंदिर येथील आदर्श शिक्षिका उज्ज्वला बाळकृष्ण ब्राम्हणकर या सोमवारी २८ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. संस्थेचे चेअरमन मनोज पाटील, ज्योती पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. फोटो आहे.

एस. पी. पाटील सेवानिवृत्त

जळगाव : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी सुरेश परशुराम पाटील हे ३१ मे रोजी ३५ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांनी जामनेर, पाचोरा, भडगाव, जळगाव या ठिकाणी सेवा बजावली आहे. फोटो आहे.

Web Title: Antigen testing camp