भुसावळातील गोळीबार प्रकरणी आणखी एकाला अटक
By Admin | Updated: July 14, 2017 12:05 IST2017-07-14T12:05:11+5:302017-07-14T12:05:11+5:30
अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.

भुसावळातील गोळीबार प्रकरणी आणखी एकाला अटक
ऑ लाईन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 14 - शहरातील भारतनगर आणि पवननगरात गोळीबार प्रकरणात शहर पोलिसांनी शुक्रवारी आणखी एका आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.शहरातील रहिवासी गौतम सोनवणे यास अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. भारत नगर आणि पवन नगरात गेल्या 25 जून रोजी गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबारात निखिल झांबरे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याचा भाऊ सुमित झांबरे आरोपींनी केलेल्या चाकू हल्यात जखमी झाला आहे.त्याच्या फिर्यादी वरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत मोरे अधिक तपास करीत आहेत.मुख्य आरोपी अद्यापही पसारच..या प्रकरणातील प्रमुख व हद्दपार आरोपी मुकेश भालेराव हा अद्यापही पसारच आहे. पोलीस त्याचा मुंबई,नागपूर,सुरत आदी ठिकाणी तपास करीत आहेत,असे पोलिसांनी सांगितले.