रोजगार निर्मितीत नंदुरबार जिल्हा राज्यात दुसरा

By Admin | Updated: November 19, 2015 00:31 IST2015-11-19T00:31:22+5:302015-11-19T00:31:22+5:30

रोजगार देण्यात नंदुरबार जिल्हा राज्यात दुसरा ठरला आहे. 8 महिन्यात 8 लाख 78 हजार 170 मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे

Another in Nandurbar district is the creation of employment | रोजगार निर्मितीत नंदुरबार जिल्हा राज्यात दुसरा

रोजगार निर्मितीत नंदुरबार जिल्हा राज्यात दुसरा

 

नंदुरबार : रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना रोजगार देण्यात नंदुरबार जिल्हा राज्यात दुसरा ठरला आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात आठ लाख 78 हजार 170 मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मजुरांची संख्या पावणे तीन लाखांपेक्षा अधिक आहे. अर्थात बहुतांश मजूर रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर करतात. तर स्थानिक स्तरावरील मजुरांची संख्या 96 हजारांवर आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी लक्ष घातले असून दर आठवडय़ाला ते आढावा घेतात. मजूर हजर रहावेत यासाठी कार्यस्थळी प्रत्यक्ष भेटीचे प्रमाणही त्यांनी वाढविले असल्याने मजुरांची संख्या वाढली आहे. दरम्यान, मजुरांना वेळीच अर्थात 15 दिवसाच्या आत मजुरी देण्याचे प्रमाण वाढावे यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू असून सध्या हे प्रमाण 46 टक्क्यांवर आहे.

 

 

Web Title: Another in Nandurbar district is the creation of employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.