शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

बºहाणपूर शहरात कोरोनाचे आणखी १६ पॉझिटिव्ह अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 14:45 IST

बºहाणपूर शहरातील बाधित रूग्णांची संख्या ३५ वर पोहोचली असून, त्यातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी बºहाणपूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ठळक मुद्देबाधितांची संख्या झाली ३५याआधी दोन रूग्णांचा मृत्यूजिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीशिवनी येथून प्रवीणसिंह नूतन जिल्हाधिकारी म्हणून रूजूसंचारबंदीत २४ तासांची मुदतवाढविशेष पोलीस महानिरीक्षक तोमरसिंह तळ ठोकून

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : आखाती राष्ट्रातील हजहून आलेल्या दाऊदपुरा भागातील माजी नगरसेवकाने बºहाणपूर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढवल्याने रविवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालातील ११६ पैकी १६ संशयित रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे आता बºहाणपूर शहरातील बाधित रूग्णांची संख्या ३५ वर पोहोचली असून, त्यातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी बºहाणपूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे. संशयित रुग्णांचे विलगीकरण करून तातडीने चाचणी करण्याबाबत कर्तव्यात हयगय केली म्हणून बºहाणपूरचे जिल्हाधिकारी राजेशकुमार कौल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. रिक्त पदावर शिवनी येथून जिल्हाधिकारी प्रवीणसिंह यांनी रविवारी रात्री पदभार स्वीकारला असून, त्यांनी बºहाणपूरच्या संचारबंदीत २४ तासांची मुदतवाढ दिली आहे.बºहाणपूर शहरातील दाऊदपुरा भागातील माजी नगरसेवकाच्या संपर्कातील १८ कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कातील आणखी १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातूनच बºहाणपूर शहरातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत ४१० जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवली असता, २८० जणांचे अहवाल प्राप्त झाले. पॉझिटिव्ह आलेल्या ३५ पैकी दोन जण मयत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रूग्णात जैनाबाद येथील एका डॉक्टरचा व ७४ वर्षीय वृध्दाचा समावेश असला तरी उर्वरित मात्र तिशीतील तथा चाळीशीतील तरूण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बºहाणपूर शहरातील जैनाबाद, इंदिरा कॉलनी, सागर टॉवर लालबाग, मोमीनपुरा, अख्तर कॉलनी मोमीनपुरा, सुभाष हॉस्पिटल, न्यूू इंदिरा कॉलनी, पाटीदार कॉलनी सिंधीपुरा या भागात या नव्याने आढळून आलेल्या रू्ग्णांचा समावेश आहे. हा भाग प्रतिबंधक क्षेत्र घोषित करून बाधित रूग्णांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण कक्षात दाखल करून तथा या प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांंद्वारे सर्व्हेक्षण मोहीम राबवली जात आहे.दरम्यान, ग्रीन झोनचे वरकरणी चित्र रंगवताना शहरात कोरोनाने घर केल्याने सर्व्हेक्षणात व संशयित रुग्णांच्या तपासणीत हयगय झाल्याप्रकरणी जिल्हाधिकारी राजेशकुमार कौल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर जिल्हाधिकारी प्रवीणसिंह यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांनी २४ तास संचारबंदीत वाढ केली आहे.दरम्यान, इंदूर विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक तोमरसिंह यांनी बºहाणपूर शहरात तळ ठोकून आहेत. त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात पथसंचलन करून कोरोनाविरूध्द लढण्याचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaverरावेर