शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री महाजन यांच्या कार्यालयाजवळ बॉम्ब असल्याच्या निनावी फोन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 20:55 IST

जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाशेजारी एका टपरीत बॉम्ब असल्याचा निनावी फोन जिल्हा पेठ पोलिसांना आल्याने सोमवारी सायंकाळी पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. बॉम्ब शोध व नाशक पथक अत्याधुनिक यंत्रासह काही मिनिटातच दाखल झाले. अर्धा तास शोध घेतल्यानंतर हाती काहीच न लागल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठळक मुद्देजळगावातील प्रकारपोलिसांची धावपळ  फोन करणारा रडारवर

जळगाव : जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाशेजारी एका टपरीत बॉम्ब असल्याचा निनावी फोन जिल्हा पेठ पोलिसांना आल्याने सोमवारी सायंकाळी पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. बॉम्ब शोध व नाशक पथक अत्याधुनिक यंत्रासह काही मिनिटातच दाखल झाले. अर्धा तास शोध घेतल्यानंतर हाती काहीच न लागल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवतीर्थ मैदानाच्या समोर असलेल्या जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाच्या शेजारी एका जुन्या टपरीत बॉम्ब असल्याचा फोन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आला. ठाणे अमलदाराने ही माहिती तातडीने प्रभारी अधिकारी संदीप आराक यांना कळविली. आराक यांनी बॉम्ब शोध व नाशक पथक व वरिष्ठांना कळवून तातडीने घटनास्थळ गाठले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम हे देखील आपल्या सहकाºयांसह महाजन यांच्या कार्यालयाजवळ पोहचले. श्वान तसेच बॉम्ब शोध पथकाच्या कर्मचाºयांनी मेटल डिटेक्टरद्वारे बॉम्ब व बॉम्ब सदृष्य वस्तूचा शोध घेतला. ज्या टपरीची माहिती मिळाली, त्या टपरीचे कुलुप तोडून तपासणी करण्यात आली. शेजारील गल्लयांमध्येही यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली, मात्र कुठेच काही मिळाले नाही.नवी मुंबई आणि जळगावात निनावी फोनजळगावप्रमाणेच नवी मुंबईतील कळंबोली येथे सुधागड महाविद्यालयाच्या शेजारी बॉम्ब असल्याचा निनावी फोन सोमवारी दुपारी नवी मुंबई पोलिसांना आला होता. तेथेही यंत्रणेची धावपळ उडाली. दरम्यान, जळगावात मंत्री महाजन यांच्या कार्यालयाशेजारील गल्लीत प्रेमीयुगुलांचे चाळे चालत असल्याने रहिवाशी कंटाळले आहेत, पोलिसांकडे तक्रार करुनही उपयोग होत नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन दामिनी पथकही निष्क्रीय झाले आहे. त्यामुळे त्यातून तर हा प्रकार कोणी केला नाही ना? याची चौकशी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव