जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST2021-01-03T04:17:18+5:302021-01-03T04:17:18+5:30
जळगाव : जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच जिल्हा संघटनेचे चेअरमन प्रा. एम. वाय. चव्हाण यांच्या अध्यक्षतेत पार ...

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात
जळगाव : जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच जिल्हा संघटनेचे चेअरमन प्रा. एम. वाय. चव्हाण यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी अध्यक्ष प्रा. नारायण खडके आणि जिल्हा उपाध्यक्ष राजेश जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सभेला कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायण खडके, कार्याध्यक्ष डॉ. पी. आर. चौधरी, उपाध्यक्ष डॉ. विजय पाटील, सहसचिव किशोर पाटील, सदस्य गिरीश पाटील, सचिन महाजन, मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी, प्राचार्य उत्तम चिंचाळे, डॉ. कांचन विसपुते, बन्सी माळी उपस्थित होते.
यावेळी कोरोना काळात स्पर्धेच्या नियमावलीबद्दल माहिती देण्यात आली. शासनाच्या नियमांचे पालन करीत जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करणे अशा धोरणात्मक बाबींवर चर्चा करून ठराव मंजूर करून निर्णय घेण्यात आले.
सभेत वय सत्यापन समिती, राज्य प्रवेशिका समिती, जिल्हा स्पर्धा आयोजन समिती, कोचिंग समिती, विविध उपक्रम आयोजन समिती, पंच पॅनेल समितीची नियुक्ती करण्यात आली. सभेत विविध विषयांवर सचिव राजेश जाधव यांनी माहिती दिली. आभारप्रदर्शन सहसचिव किशोर पाटील यांनी केले.