आदर्श कर्मचारी पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:12+5:302021-09-09T04:21:12+5:30
राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. स्वाभिमानी शिक्षक-शिक्षकेतर संघाने अनुदानित आश्रमशाळेतील आदर्श मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर ...

आदर्श कर्मचारी पुरस्कार जाहीर
राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. स्वाभिमानी शिक्षक-शिक्षकेतर संघाने अनुदानित आश्रमशाळेतील आदर्श मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर केले आहेत.
या संघटनेचे राज्य अध्यक्ष भरत पटेल, उपाध्यक्ष विजय कचवे, कार्यवाह हिरालाल पवार, सहकार्यवाह भूपेंद्र पाटील असून, जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील व जिल्हा कार्यकारिणी यांनी पुरस्कार जाहीर केले आहेत, असे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख उत्तमराव मनगटे पाटील यांनी कळविले आहे.
आदर्श कर्मचारी पुरस्कार पुढीलप्रमाणे :
आदर्श प्राथमिक मुख्याध्यापक जगदीश सीताराम पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक शरद छगन मोरे, प्राथमिक शिक्षक राकेश चिंधू महाजन, माध्यमिक शिक्षक दिलीप सोमा सावकारे, उच्च माध्यमिक शिक्षक उदयभान शांताराम महाजन, क्रीडा शिक्षक शिवाजी देवराम महाजन, तंत्रस्नेही शिक्षक महेशकुमार चंद्रशेखर शिंदे, अधीक्षक शशिकांत प्रल्हाद भालेराव, अधिक्षिका रूपाली सुनील पाटील, कनिष्ठ लिपिक भगवान संतोष पाटील, प्रयोगशाळा परिचर सुकलाल नथू पाटील, शिपाई नरेंद्र उखा महाजन, स्वयंपाकी कांतीलाल छगन पाटील, कामाठी सखाराम बन्सी चव्हाण, मदतनीस गोपाल नाना पाटील, पहारेकरी प्रवीण रामचंद्र पाटील आदी कर्मचाऱ्यांना आदर्श पुरस्कार जाहीर झाले आहेत. लवकरच पुरस्कार वितरण करण्याची तारीख ठरविण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांनी म्हटले आहे.