विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांची निवड जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:33 IST2021-09-02T04:33:10+5:302021-09-02T04:33:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विद्यार्थी परिषद अर्थात स्टुडंट कौन्सिलच्या सदस्यांची निवड प्रक्रिया नुकतीच ...

Announcement of selection of student council members | विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांची निवड जाहीर

विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांची निवड जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विद्यार्थी परिषद अर्थात स्टुडंट कौन्सिलच्या सदस्यांची निवड प्रक्रिया नुकतीच मतदानाद्वारे पार पडली. यात प्रथम ते तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मतदान करून हे सदस्य निवडले आहेत. मतमोजणीनंतर त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते १२ वाजेदरम्यान, परिचारिका महाविद्यालयात यासाठी मतदान घेण्यात आले. दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान अधिष्ठाता कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. १९ उमेदवारांमध्ये ही लढत झाली. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किशोर इंगोले, निवडणूक अधिकारी डॉ. उमेश जाधव तर मतमोजणी अधिकारी म्हणून डॉ. सतीश सुरडकर यांनी जबाबदारी सांभाळली.

यांची झाली निवड

क्रीड संवर्ग

पुरुष : तेज कटुले

महिला : राधिका धेंडे

एनएसएस संवर्ग

पुरुष : प्रसाद सावंत

महिला : शारदा झा

एनसीसी संवर्ग

पुरुष : अथर्व जाधव

महिला : दिव्या चव्हाण

सांस्कृतिक संवर्ग

पुरुष : चैतन्य सातपुते

महिला : फोरिका मेहता

संशोधन संवर्ग

पुरुष : अविरत पांडव

महिला : खुशी भिवगड

Web Title: Announcement of selection of student council members