स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST2021-05-29T04:13:37+5:302021-05-29T04:13:37+5:30

जळगाव : शहरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विविध संस्था, संघटना यांनी सावरकर यांना ...

Anniversary celebration of Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

जळगाव : शहरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विविध संस्था, संघटना यांनी सावरकर यांना अभिवादन केले. तसेच त्यांच्या कार्याची महती देखील सांगितली.

अखिल भारतीय हिंदू महासभा

अखिल भारतीय हिंदू महासभेतर्फे विनायक दामोदर सावरकर यांची जयंती जिल्हा हिंदू महासभेच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ॲड.पद्माकर जैन यांनी प्रतिमेचे पुजन केले. योगेश सपकाळे यांनी सावरकर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान दिले. यावेळी नंदा दर्जी, योगेश सपकाळे, नीलेश जाधव, धनंजय भोळे, ओंकार कोंडाळकर उपस्थित होते.

गिरीजाबाई चांदसरकर प्राथमिक विद्या मंदिर

गिरीजाबाई नथ्थुशेठ चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्या मंदिरात प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुषण अमृतकर उपस्थित होते.

Web Title: Anniversary celebration of Swatantryaveer Savarkar