जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:15 IST2021-05-16T04:15:59+5:302021-05-16T04:15:59+5:30

जळगाव : श्रीराम तरुण सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रथ चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची (परंपरेनुसार) जयंती साजरी करण्‍यात आली. ...

Anniversary celebration | जयंती साजरी

जयंती साजरी

जळगाव : श्रीराम तरुण सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रथ चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची (परंपरेनुसार) जयंती साजरी करण्‍यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष जीवन तायडे, मयूर बारी, ललित कोळी, पंकज भारुडे, विक्की भोईटे, अभिजीत कदम, राहुल मिस्त्री, समाधान पाटील, ऋषिकेश भोई, अतुल कासार, बबलू कोळी, श्याक कोळी आदींची उपस्थिती होती.

------------------------

जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा

जळगाव : जळगाव जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष सोहेल अमीर यांच्या नेतृत्वाखाली कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. नंतर टास्क फोर्सच्या कार्याची माहिती दिली व पुढील रणनीतीबाबत चर्चा केली, तसेच औषधांचे काळा बाजारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात आरिफ देशमुख, रेहान खाटीक, वसीम भाई, शाहीद भाई आदींची उपस्थिती होती.

-----------------

समिती कधी स्थापन होणार

जळगाव : राजभवनाकडून अद्याप कुलगुरू शोध समिती गठीत करण्यात आलेली नाही. ही समिती कधी गठीत होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठात प्रभारी राज सुरू असल्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Anniversary celebration