श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे अन्नछत्र योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:22+5:302021-08-23T04:20:22+5:30
गेल्या चार वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात श्री जैन युवा फाउंडेशन काम करीत असून त्याचाच एक भाग म्हणून हा ...

श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे अन्नछत्र योजना
गेल्या चार वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात श्री जैन युवा फाउंडेशन काम करीत असून त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये दररोज गरजू १०० जणांना अन्न वाटप करण्यासह येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात काम करणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद चांदीवाल सांगितले. या प्रकल्पाची संकल्पना प्रवीण पगारिया व मनोज लोढा यांची असून शुभारंभप्रसंगी महेंद्र कोठारी, अजित संघवी, दिलीप गांधी, आनंद कांकरिया,राजेश जैन उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी सचिव विनय गांधी,उपाध्यक्ष पियूष संघवी,कोषाध्यक्ष पारस कुचेरिया, सचिन राका, प्रीतेश चोरडिया, अनीश चांदीवाल, रिकेश गांधी, प्रवीण छाजेड, सौरभ कोठारी, अमोल फुलफगर, सनी कावडिया, संदीप सुराणा, अमोल श्रीश्रीमाल, अनिल सिसोदिया, प्रणव मेहता,पूर्वेश शाह,अजित मेहता,विरल शाह यांनी परिश्रम घेतले. सकल जैन संघाचे अध्यक्ष दलूभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.