अंजली दमानिया, मालपुरे यांची फेसबुकवर बदनामी

By Admin | Updated: January 12, 2017 00:56 IST2017-01-12T00:56:38+5:302017-01-12T00:56:38+5:30

इंडियन पॉलिटेकAीकल न्यूज या फेसबुकवरील पेजवर अंजली दमानिया व गजानन मालपुरे यांच्याविषयी वाईट पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी 24 जणांविरुध्द बुधवारी गुन्हा दाखल आहे.

Anjali Damaniya, Malpure, Defamation on Facebook | अंजली दमानिया, मालपुरे यांची फेसबुकवर बदनामी

अंजली दमानिया, मालपुरे यांची फेसबुकवर बदनामी


जळगाव : इंडियन पॉलिटेकAीकल न्यूज या फेसबुकवरील पेजवर सामाजिक कार्यकत्र्या अंजली दमानिया व शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांच्याविषयी वाईट पोस्ट टाकून बदनामी व शिवीगाळ केल्याप्रकरणी 24 जणांविरुध्द बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
मालपुरे यांना हद्दपार, तोडीपाणी करणारा, प्रिपेड कार्ड, ‘मालपुरे काय लढणार न्यायालयीन लढाई’ आदी बदनामीकारक तर दमानिया यांच्याबाबतीत अलि पोस्ट टाकण्यात आल्या आहेत.  इंडियन पॉलिटेकAीकल न्यूज फेसबुक अकांऊटधारक, नरेंद्र चौधरी, संतोष बोडके, विलास यादव, विलास गायकवाड, ¨पटू सावळे, नितेष भदाणे, विलास ठाकरे, रमेश ढाके, बाळासाहेब एन कराड, दिवाकर रडे, तेजस कोल्हे, हजारे विकास, अमोल पाटील, प्रदीप ढाकणे, समाधान सूर्यवंशी, अनंत गिते, दादासाहेब गिते, साहेबराव थोटे, मराठा जागृती साळुंखे, उज्‍जवल खाजणे, चंद्रशेखर पाटील, सिध्दीविनायक फुले व संजय शेंडगे यांच्याविरुध्द मालपुरे यांच्या फिर्यादीवरून माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक कुबेर चवरे तपास करीत आहेत.

Web Title: Anjali Damaniya, Malpure, Defamation on Facebook