शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

योगाचा प्रचार करणाऱ्या अनिता पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 00:08 IST

गेल्या काही काळापासून राज्यात आणि देशभरात विविध योगा स्पर्धांमध्ये जळगावच्या खेळाडूंनी नाव कमावले. त्या सर्व खेळाडूंच्या मागे उभ्या आहेत. त्या योग शिक्षिका, आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक डॉ.अनिता सतीश पाटील. योगाच्या अभ्यासक डॉ.अनिता पाटील यांच्याविषयी लिहिताहेत ‘लोकमत’चे उपसंपादक आकाश नेवे...

अनिता पाटील या मूळच्या वर्धा येथील. लग्नानंतर त्या नागपूरला स्थायिक झाल्या. सतीश पाटील हे महावितरण कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत आहेत. २००५ मध्ये हे दाम्पत्य जळगाव शहरात वास्तव्याला आले आणि जळगावचेच झाले. नागपूरला असताना अनिता पाटील या मेडिकल स्टोअर्स चालवत असत. नंतर त्यांनी योग प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. आणि यातच त्यांना त्यांचे ध्येय सापडले. त्यांनी त्याच मार्गावरून पुढे चालण्यास सुरुवात केली. जळगावला आल्यावर अनिता पाटील यांनी जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या कामाला सुरूवात केली. विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये पदकांची लयलुट करणारे तनय मलारा, श्रद्धा मुंदडा, योगेश्वरी मिस्त्री, राधिका पाटील हे अनिता पाटील यांचेच शिष्य आहेत. त्यांच्याकडे लयबद््ध योगा शिकण्यासाठी राज्यभरातून खेळाडू येतात. हे खेळाडू त्यांच्याच कुटुंबाचा भाग बनून राहतात.अनिता पाटील यांनी आशियाई आणि आंतरराष्ट्रीय योग स्पर्धांसाठी पंच म्हणून तसेच संघाचे प्रशिक्षक म्हणूनदेखील काम पाहिले आहे.अनिता पाटील यांची मुलगी श्रद्धा हीदेखील योगपटू आहे. ती सध्या फिलीपिन्स येथे शिकत आहे. तिने फिलीपिन्सच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केली आहे.सध्या त्या जळगाव शहरात के.के. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ योग, नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड रिसर्चच्या माध्यमातून आपले योग प्रसाराचे काम करत आहे. त्यासोबत परदेशातूनही काही जण त्यांच्याकडे योग शिकायला येतात. यातील बहुसंख्य मुलांकडून त्या कोणतेही शुल्क घेत नाहीत. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था पाटील यांच्या घरीच केली जाते.२००५ मध्ये तीन खेळाडूंना घेऊन सुरू झालेला हा प्रवास आता सुमारे ३५० च्या वर योगपटूंवर पोहचला आहे. त्यासोबतच अनेक विविध व्याधींनी त्रस्त असलेलेदेखील त्यांच्याकडे येऊन योग शिकतात. शहरातील झुलेलाल हॉल, जाणता राजा प्रतिष्ठान येथेदेखील त्यांचे योग वर्ग सुरू आहेत. ्अनिता पाटील या सध्या जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनच्या सचिव आहे. त्याचप्रमाणे योगाशी संबंधित अनेक संस्थांवर त्यांचे काम सुरू आहे.-आकाश नेवे, जळगाव

टॅग्स :YogaयोगJalgaonजळगाव