अनिल पाटील यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST2021-07-05T04:12:05+5:302021-07-05T04:12:05+5:30

फोटो पारोळा : क्षत्रिय मराठा संघटनेच्या जिल्हा प्रवक्तेपदी अनिल कौतीक पाटील यांची निवड करण्यात आली. संघटनेचे जिल्हा ...

Of Anil Patil | अनिल पाटील यांची

अनिल पाटील यांची

फोटो

पारोळा : क्षत्रिय मराठा संघटनेच्या जिल्हा प्रवक्तेपदी अनिल कौतीक पाटील यांची निवड करण्यात आली. संघटनेचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी ॲड. भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर भोसले, ईश्वर पाटील उपस्थित होते.

प्रतापच्या भरतीची

चौकशीची मागणी

अमळनेर : अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या झालेल्या भरती व आर्थिक राजकारण याबाबत सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव भूषण भदाणे व सचिव कुणाल पवार यांनी केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.

अमळनेर बाजार समितीचे

कामकाज आज बंद

अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवार ५ जून रोजी एक दिवसासाठी बंद राहणार आहे, असे बाजार समितीतर्फे कळविण्यात आले आहे. त्या दिवशी एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे व्यापारी असोसिएशन यांच्या अर्जानुसार बाजार समितीचे कामकाज बंद असणार आहे. शेतकरी बांधवांनी या दिवशी माल विक्रीस आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Of Anil Patil