शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

Lok Sabha Election 2019 : धुळ््यात अनिल गोटे यांची बंडखोरी कुणाला ‘मारक’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 13:05 IST

बंडखोरीवर भाजपा पक्षश्रेष्ठींचे मौन

धुळे : धुळे शहर भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी बंडखोरी करत लोकसभा मतदारसंघात आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आधी भाजपा उमेदवाराला पराभूत करण्यासाठी उमेदवारी करीत असल्याची घोषणा देणाऱ्या आमदार अनिल गोटे यांनी नंतर मात्र आपली उमेदवारी जिंकण्यासाठी असल्याचे सांगत भाजपासह सर्वच पक्षाला आव्हान दिले. दुसरीकडे भाजपा पक्षश्रेष्ठींनी मात्र सुरुवातीपासूनच आमदार अनिल गोटे यांच्या बंडखोरीवर मौन बाळगत दुर्लक्ष केले. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तर गोटेंनी डिपॉझीट वाचवून दाखवावे, असे आव्हानच दिले आहे.धुळे लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदार अनिल गोटे यांनी आपण निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला होता. तसेच धुळ्यात आयोजित सभेत व्यासपीठावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो प्रसिद्ध केले. तसेच ‘अण्णाला मत म्हणजे मोदी साहेबानांच मत’, असेसुद्धा लिहीले होते. अर्ज दाखल केल्यानंतर अनिल गोटे यांच्या उमेदवारी अर्ज माघारीसाठी भाजपा पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.भाजपा पक्षश्रेष्ठींचे मौनधुळे महापालिका निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा देत स्थानिक भाजपा नेतेमंडळीविरुद्ध बंड पुकारले होते. त्यावेळी भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आमदार अनिल गोटे यांना मुंबईला बोलावून चर्चा करुन त्यांचा आमदारकीचा राजीनामा नामंजूर करीत असल्याचे जाहीर करुन मध्यस्थीचे प्रयत्न केले होते. आमदार अनिल गोटे यांच्याशी अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपा पक्षश्रेष्ठीने प्रयत्न केले होते. त्यामुळे यावेळीही तसे प्रयत्न होतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली. तसे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न झाले नाही. गोटे यांच्या बंडखोरीवर कोणीच वक्तव्य केले नाही किंवा वक्तव्य करण्याचे टाळले. याउलट उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आयोजित भाजपच्या सभेत तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी डिपॉझीट वाचविण्याचेच आव्हान देऊन भाजप आता गोटेंशी जुळते घेण्यास तयार नसल्याचे संकेतच दिले होते.अनिल गोटेसुद्धा ठामगोटे यांनीही सुरुवातीपासूनच अपक्ष उमेदवारी करण्याच्या निर्णयावर ठाम होते. तसेच त्या अनुषंगाने त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क व प्रचारही सुरु केला होता. त्यामुळे यावेळी गोटे हे माघारीच्या मुडमध्ये नव्हतेच, असे स्पष्ट होते. आता माघारीनंतर प्रत्यक्ष प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप नेते व आमदार गोटे यांच्यात आरोप - प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगणारच. परंतू आमदार गोेटेंची उमेदवारी या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस उमेदवारांपैकी कोणासाठी ‘मारक’ ठरणार, हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.काँग्रेस - राष्टÑवादीचेही मौन कायमकाँग्रेस - राष्टÑवादी आघाडीनेही आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारीसंदर्भात कुठलेही वक्तव्य करण्याचे टाळले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर गोटे यांनी मुंबईत राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे धुळ्यातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पाठिंब्यासाठी गोटेंशी चर्चा करुन अर्ज माघारीसाठी प्रयत्न होतील, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु ती सुद्धा फोल ठरली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव